प्रवीण दरेकरांच्या हातून मुंबै बँकेची सत्ता खेचली | भाजपला मोठा धक्का

0
1309

मुंबई : दि. १३ : गेल्या अनेक वर्षापासून मुंबई जिल्हा बँकेवरचे प्रवीण दरेकरांचे वर्चस्व आता संपुष्ठात आलं आहे. शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वत: या निवडणुकीची सूत्रं हाती घेत भाजपच्या प्रवीण दरेकरांना धक्का दिला आहे. महाविकास आघाडीचे सिद्धार्थ कांबळे हे विजयी झाले असून त्यांनी भाजपच्या प्रसाद लाड यांचा पराभव केला आहे. राष्ट्रवादी काँगेसचे सिद्धार्थ कांबळे यांना 11 मते मिळाली तर भाजपच्या प्रसाद लाड यांना 9 मतं मिळाली आहेत. उपाध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाली आहेत.

मुंबई जिल्हा बँक अध्यक्षपदाच्या निवडणुकीआधी आदित्य ठाकरे यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या संचालकांची बैठक बोलावली होती. या बैठकीत महाविकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित व्यूहरचना करत भाजपच्या प्रवीण दरेकरांचं वर्चस्व मोडून काढण्याचं ठरलं. त्याच पद्धतीने नियोजन करत आता सिद्धार्थ कांबळेंना अध्यक्षपदी बसवण्यात आलं आहे.

सिद्धार्थ कांबळे हे राष्ट्रवादीचे नेते असून त्यांनीच गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीची कमान सांभाळली आहे. त्यांच्याच कामाचा अनुभव या निवडणुकीत कामाला आल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, मुंबई बँकेचे अध्यक्षपद हे एक वर्षानंतर शिवसेनेला देण्यात येणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.