‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून अभिनेत्याला बाहेरचा रस्ता | राजकीय भूमिका घेणंं भोवलं

0
79

मुंबई :

‘मुलगी झाली हो’ मालिकेत विलास पाटीलची भूमिका साकारणारा अभिनेता किरण माने यांना मालिकेतून तडकाफडकी काढून टाकण्यात आलं आहे. किरण त्यांच्या भूमिकांसोबतच सोशल मीडियावर परखडपणे मत व्यक्त करण्यासाठीही ओळखले जातात. त्यांच्या अनेक पोस्टची सोशल मीडियावर चर्चा होत असते. मात्र आपलं मत स्पष्टपणे मांडणं त्यांना आता भोवलं आहे. एक पोस्टमुळे त्यांना ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यावर मालिकेचे चाहते वाहिनीवर संतापले असून किरण यांनी स्वत: याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला आहे.

समाजात घडणाऱ्या गोष्टी आणि राजकीय घडामोडींवर अगदी मोजक्या शब्दात एक पोस्टमध्ये मांडलेलं मत मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालं होतं. एक मुलाखतीमध्ये माने यांनीच या संदर्भात खुलासा करत राजकीय घटनांवर भूमिका मांडल्यामुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

सोशल मीडियावर वाहिनीने घेतलेल्या या निर्णयाला प्रेक्षकांचा विरोध होताना दिसत आहे. #istandwith_KiranMane हा हॅशटॅग सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणत ट्रेंड होत आहे. या ट्रेंडवर वाहिनी आणि मालिका काय प्रतिक्रिया देते याची वाट नेटकरी बघत आहे.

त्याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही यावर तिखट शब्दात प्रतिक्रिया दिलीय. अनेक नेत्यांनी सोशल मिडीयावर नाराजी व्यक्त करत किरण मानेला पाठिंबा दर्शविलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.