प्रगतशील शेतकरी अर्चना तुळसुलकर यांचं निधन

0
46

सावंतवाडी :

कारिवडे-पेडवेवाडी येथील प्रगतशील शेतकरी बागायतदार अर्चना अरविंद तुळसुलकर, वय 57 यांचे शुक्रवारी दुपारी हद्यविकाराच्या झटक्याने निधन झाले.

बुर्डीपूल शेजारील खडतर डोंगरात त्यांनी मेहनतीने नारळ, सुपारी, काजूची बाग फुलवली होती. पती तथा आरोग्य भुवनचे मालक कै. अरविंद उर्फ अण्णा तुळसुलकर यांचे 12 वर्षापूर्वी अचानक निधन झाले. त्यानंतर त्यांनी मोठ्या समर्थपणे कुटुंबाचा गाडा हाकत, शेती, बागायती केली. मसाल्याची पिके घेतली. शेती, बागायतीत त्या सतत सक्रिय होत्या.

त्यांच्या दोन्ही मुली अश्विनी व मयुरी ह्या मल्टीनँशनल कंपन्या मध्ये पुणे येथे सर्व्हिस मध्ये आहेत. मुलगा पंकज सालईवाडा येथे व तलावाकाठी आरोग्य भुवन हे पारंपरिक व्यवसाय असलेले दुग्धव्यवसायाचे दुकान चालवतात.
त्यांची तब्येत ठिक वाटत नसल्याने त्या सबनिसवाडा- सावंतवाडी येथे आपल्या मूळ घरी आल्या होत्या. तिथून त्या उपचारांसाठी खासगी रुग्णालयात गेल्या होत्या. त्यांना तिथेच दुपारी हद्यविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.