अतुल काळसेकरांनी घेतली विनोद तावडेंची भेट | माजी मंत्र्यांनी जिल्हा बँक उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दिलं ‘हे’ खास गिफ्ट

0
879

सिंधुदुर्ग :

सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अतुल काळसेकर यांचे भाजप राष्ट्रीय सरचिटणीस, माजी मंत्री, विनोद तावडे यांनी अभिनंदन केले. याप्रसंगी माजी राज्यमंत्री आ‌. रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

तुमचे संघटन कौशल्य आणि राजकीय – सामाजिक क्षेत्रातील कार्याचा अनुभव यामुळे ही नवी जबाबदारीही तुम्ही समर्थपणे सांभाळाल असा विश्वास त्यांनी यावेळी विनोद तावडे यांनी व्यक्त केला. याचबरोबर माजी मंत्री विनोद तावडे यांनी अतुल काळसेकर यांना काही खास गिफ्ट दिल्यात. त्यात ब. नाथ पै. यांच्या पुस्तकाचा समावेश आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.