मी मोदीला मारू शकतो, शिव्याही देऊ शकतो | नाना पटोलेंंचं वादग्रस्त वक्तव्य

0
486

भंडारा :

जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँगेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात पक्षाचा पाया मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या.रविवारी संध्याकाळी घेण्यात आलेल्या प्रचारसभेच्या दरम्यान नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे वक्तव्य केले आहे. या संबंधिचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होताना दिसतोय.

हा व्हिडीओ रात्रीच्या वेळचा आहे. या प्रचाराच्या दरम्यान कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या भोवती लोकांचा गराडा आहे. त्यावेळी बोलताना नाना पटोले म्हणतात की, ‘मी मोदीला मारू शकतो आणि शिव्याही देऊ शकतो.’ नाना पटोलेंचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत असून यावर विविध पक्षांच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आल्या आहेत.

नाना पटोलेंंचं स्पष्टीकरण 

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नाना पटोले यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून यावर स्पष्टीकरण दिलं आहे. नाना पटोले म्हणाले की, “भंडारा जिल्ह्यात मोदी असं टोपणनाव असलेला एक गावगुंड आहे. त्या गुंडाबाबत बोलताना मी ते वक्तव्य केलं आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत ते नाही.”

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.