देवगडात ७४.४६ टक्के मतदान

0
122

देवगड :

देवगड-जामसंडे नगरपंचायत निवडणूकीचा उर्वरित चार प्रभागांची निवडणूक प्रक्रिया मंगळवार १८ जानेवारीला शांततेत पार पडली. प्रभाग क्र. ४, ५, ७, ८ या चारही प्रभागासाठी एकूण ७४.४६ % मतदान झाले यामध्ये १३९१ पैकी ९९१ महिला तर १४०९ पैकी १०९४ पुरुष मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

बुधवार 19 जानेवारीला ही सकाळी दहा वाजता देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या 17 प्रभागांच्या मतमोजणीला सकाळी दहा वाजता देवगड तहसील कार्यालय येथे सुरुवात होणार आहे . एकूण पाच टप्प्यात ही मोजणी होणार आहे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या,व चौथ्या टप्प्यात चार व पाचव्या टप्प्यात एक या पद्धतीने ही मतमोजनी होईल. दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व जागांच्या निकालाचे चित्र स्पष्ट होईल. दरम्यान आज सकाळीच सात वाजल्यापासून मतदान प्रक्रिया शांततेत सुरू झाली मात्र प्रभाग सात वर्दीतील सात मधील मतदान केंद्रावर अकरा वाजता दंगल नियंत्रण पथक आल्याने थोडेसे वातावरण काय झाले मात्र यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख विलास साळसकर प्रभाग सातशे उमेदवार योगेश चांदुरकर यामध्ये शाब्दिक चकमक झाली मतदान केंद्रावर मतदार प्रतिनिधी उमेदवार वगळता अन्य माणसाने येऊ नये यावर शिवसेना तालुकाप्रमुख यांनी आक्षेप घेतला होता पत्रकारांनाही मतदान केंद्रावर घेऊनही असाही त्यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे काही वेळ वातावरण तंग होते. मात्र मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती. कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेतली होती. चोख पोलिस बंदोबस्त असल्याने मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.

देवगड जामसंडे नगरपंचायतसाठी एकूण ७४.४६ टक्के मतदान झाले असून यामध्ये प्रभाग क्र. ४ मध्ये ८२.५८ % मतदान झाले. एकूण ७२९ मतदारांपैकी महिला २९५ व पुरुष ३०७ असे एकूण ६०२ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या प्रभागात सर्वात जास्त मतदान झाले. प्रभाग क्र ५ मध्ये ६९.२६ % मतदान झाले. एकूण ५२२ मतदारांपैकी महिला १७८ व १८९ पुरुष असे एकूण ३६७ मतदारांनी मतदान केले. प्रभाग क्र. ७ मध्ये ६६.२७% मतदान झाले.

एकूण ८४१ मतदारापैकी २७७ महिला व ३१८ ,पुरुष असे एकूण ५९५ मतदारांनी मतदान केले तर प्रभाग क्र. ८ मध्ये ७३.५९% मतदान झाले यामध्ये २४१ महिला तर २८० पुरुष असे मिळून ५२१ मतदारांनी मतदान केले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.