दोडामार्गचा किंग कोण ? | उद्या १०.३० पहिला निकाल हाती

0
299

दोडामार्ग :

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी पैकी उर्वरित ४ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर ४७ उमेदवारांवच भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे. दोडामार्गात तब्बल २२३९ जणांनी मतदान करत उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद केलं आहे. उद्या मंगळवारी सकाळी १० वा. त्याच्या मतमोजणीस सुरुवात होणार आहे. मतमोजणीच्या एकुण ४ फेऱ्या होणार असून दोडामार्गचा किंग कोण ? हे उद्या दुपारपर्यंत स्पष्ट होणार आहे.

कसई-दोडामर्गाच्या निवडणुकीत १७ जागांसाठी ४७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. काही प्रभागांमध्ये तिरंगी तर प्रभाग क्रमांक ८ मध्ये पंचरंगी लढत झाली. यात भाजपकडून १६, आरपीआय १, शिवसेना १०, राष्ट्रवादी ७, कॉंग्रेस ६, अपक्ष ७ जागांवर आपल नशिब आजमवत आहेत.

सेना-राष्ट्रवादीसह भाजप नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला !

निवडणूकी दरम्यान, आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी शिवसेनेचे माजी राज्यमंत्री आ. दीपक केसरकर दोडामार्गात थांड मांडून होते. डोअर टू डोअर ‘जात त्यांनी आपल्या उमेदवारांचा प्रचार केला. तर राष्ट्रवादीचे नेते सुरेश दळवी, विधानसभा अध्यक्षा अर्चना घारे-परब यांनी देखील उमेदवारांसाठी तळ ठ़ोकला होता.

दरम्यान, भाजपकडून स्वतः केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे दोडामार्गात येऊन गेले होते. भाजपचे संकट मोचक माजी राज्यमंत्री आ. रविंद्र चव्हाण, भाजप प्रदेश सचिव निलेश राणेंसह आ. नितेश राणेंची सरप्राईज व्हिझिट दोडामार्गात दिली होती. त्यामुळे या सर्व नेत्यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत.

धाकधुक वाढली !

माजी नगराध्यक्ष संतोष नानचे, माजी उपनगराध्यक्ष चेतन चव्हाण, माजी नगराध्यक्ष लीना कुबल, माजी नगरसेविका संध्या प्रसादी, राष्ट्रवादी शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, माजी नगरसेविका सुषमा मिरकर, माजी नगरसेवक राजेश प्रसादी, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, पुनम महाले, गौरी पार्सेकर, चंदन गांवकर, ओमकर फाटक, सुचन कोरगांवकर, नितीन मणेरीकर, रामचंद्र ठाकुर, लवू मिरकर, सुकन्या पनवेलकर, संजना म्हावळणकर यांच्या निकालाकडे विशेष लक्ष लागून राहिले आहे.

नगरपंचायत रणसंग्रामात शिवसेना- राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप एकमेकांना भिडणार असून ४ जागांसाठी झालेल्या मतदान प्रक्रियेत 80.23 % एवढं मतदान झाल. 4 प्रभागात 11 उमेदवार रिंगणात होते. यात प्रभाग 1 मध्ये 76 टक्के, प्रभाग 4 मध्ये 76 टक्के, प्रभाग 8 मध्ये 83 टक्के, प्रभाग 10 मध्ये 83 टक्के मतदान झाल.
4 जागांसाठी 602 पैकी 483 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून यात महिला 237, पुरुष 243 आहेत. आज सकाळी 10 वा. मतमोजणीस सुरुवात होणार असून मतमोजणीच्या 4 फेऱ्यानंतर दोडामार्गचा किंग कोण ? हे स्पष्ट होणार आहे.

अशी झाली फाईट !

प्रभाग क्रमांक १ ग्रामीण रुग्णालय दोडामार्ग परिसरात
राष्ट्रवादीचे सुदेश तुळसकर भाजपाकडून रामचंद्र प्रभाकर मणेरीकर, प्रभाग क्रमांक २ राष्ट्रीळी मंदिर परिसरात सुनील मनोहर बोर्डेकर बीजेपी,
रामचंद्र सोमा ठाकूर राष्ट्रवादी,
विष्णू प्रकाश रेडकर कॉंग्रेस, प्रभाग क्रमांक ३ सावंतवाडा काही भाग व गावडेवाडी व शिक्षक कॉलनी व सिद्धिविनायक कॉलनीतून पूनम योगेश महाले –शिवसेना,
गौरी मनोज पार्सेकर- बीजेपी,
लीना महादेव कुबल – अपक्ष
तेजा रमेश पेडणेकर – कॉंग्रेस,
प्रभाग क्रमांक ४  बाजारपेठ काही भाग भोसले कॉलनी इथं
वासंती अनिल मयेकर- शिवसेना
रेश्मा उद्देश कोरगावकर- बीजेपी यांच्यात तर प्रभाग क्रमांक ५ म्हावळंणरवाडी, सर्वसाधारण महिला मध्ये सोनल सुनील म्हावळणर- बीजेपी,
अपर्णा अभिजित देसाई- राष्ट्रवादी, दीपाली दिलीप नाईक – अपक्ष तर प्रभाग क्रमांक ६ केळीचे टेंब, सर्वसाधारण
रामराव ज्ञानेश्वर गावकर – शिवसेना, ओंकार विश्वनाथ फाटक- बीजेपी
सचिन सुरेश उगाडेकर – काँग्रेस यांच्यात लढत झालीय.

दरम्यान, प्रभाग क्रमांक  ०७ – सर्वसाधारण कसई गावठाण
देविदास कृष्णा गवस – बीजेपी,
संदीप हरिश्चंद्र गवस – राष्ट्रवादी,
संदीप सखाराम लब्धे – काँग्रेस, तर प्रभाग क्रमांक – ८ बाजारपेठ काही भाग व गोवेकर कॉलनीत पंचरंगी लढत झाली. संध्या राजेश प्रसादी – अपक्ष,
सुषमा लवू मिरकर – शिवसेना,
प्रेरणा प्रताप नाईक – काँग्रेस,
परमेकर- अपक्ष
रुक्मिणी विठ्ठल शिरसाठ – भाजप अशी लढत झाली.

प्रभाग क्रमांक –  ९  सावंतवाडा व बाजारपेठेत राजेश शशिकांत प्रसादी – बीजेपी,
नारायण (सूचन) वसंत कोरगावकर – शिवसेना,
प्रकाश यशवंत नाईक – काँग्रेस, प्रभाग क्रमांक –  १० हनुमंत कॉलनी व ओंकार कॉलनीत संतोष दिनकर नानचे –भाजप, प्रशांत दत्ताराम नाईक – शिवसेना,प्रभाग क्रमांक –  ११ बाजारपेठ पिंपळेश्वर चौक व गोवा रोड परिसर, सर्वसाधारणमधून नितीन प्रभाकर मणेरीकर- भाजप,
लवू शांताराम मिरकर – शिवसेना, प्रभाग क्रमांक – १२ हरीजनवडी बाजारपेठ मराठी शाळा परिसरात शुभांगी रवींद्र खडपकर – राष्ट्रवादी,
ज्योती रामांकात जाधव – अपक्ष( रिपाइ भाजप पुरस्कृत ),
प्रतिभा गणपत जाधव – अपक्ष, प्रभाग क्रमांक  – १३ खालची धाटवाडी, शिवकृपा नगर आणि सोलदेवाडी, सर्वसाधारण महिला
उर्मिला उल्हास साळकर – शिवसेना, स्वराली स्वप्नील गवस – भाजप, प्रभाग क्रमांक – १४
खालची धाटवाडी काही भाग, अनुसूचित महिला जातीत तेजस्विता प्रसाद जाधव- शिवसेना,
क्रांती महादेव जाधव – भाजपा,
स्वाती सुंदर गावकर – काँग्रेस,
प्रभाग क्रमांक  – १५ सुरुचिवाडी काही भाग व खालची धाटवाडी काही भागातून चेतन सुभाष चव्हाण – भाजप,
विजय रामकृष्ण मोहिते – राष्ट्रवादी प्रकाश कोरगावकर- अपक्ष अशी लढत झाली‌. तर
प्रभाग क्रमांक – १६ वरची धाटवाडी काही भाग खालची धाटवाडी काही भागात संगीता सिद्देश बोडेकर – राष्ट्रवादी,
सुकन्या सुधीर पनवेलकर – भाजप, प्रभाग क्रमांक – १७ फक्त वरची धाटवाडी काही भागात
राजलक्ष्मी श्रीराम गवस- शिवसेना,
संजना संतोष म्हावळंणकर -भाजप यांच्यात थेट लढत झाली.

बॉक्स- अशी होईल मतमोजणी
पहिली फेरी- प्रभाग १ ते ५
दुसरी फेरी- प्रभाग ६ ते १०
तिसरी फेरी – प्रभाग ११ ते १५
अंतिम चौथी फेरी – प्रभाग १६ व १७

त्यामुळे १० ला सुरू होणारी मतमोजणी दुपारी १ ते १.३० पर्यंत पूर्ण होईल. तहसीलदार कार्यालयाच्या छतावर ओपन प्लेस मध्ये पत्र्याच्या शेड खाली हे मतमोजणी केंद्र कार्यान्वित करण्यात आलं आहे. संपूर्ण तहसीलदार कार्यालय उद्या मतमोजणी असल्याने प्रशासकीय कर्मचारी व उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी व मतमोजणी अधिकारी आणि मीडिया वगळता अन्य लोकांसाठी सील केलं जाणार आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.