मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट | तीन जवान शहीद

0
171

मुंबई : 

मुंबईत INS रणवीर युद्धनौकेवर स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेत तीन जवान शहीद झाले आहेत.नेव्हल डॉकयार्ड मुंबई येथे आज INS रणवीरच्या अंतर्गत कंपार्टमेंटमध्ये हा स्फोट झाला आहे. जहाजाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे. कोणतीही मोठी भौतिक हानी झाल्याचे माहिती नसली तरी तीन नौदल जवान यामध्ये शहीद झाले आहेत

INS रणवीर युद्धनौका नोव्हेंबर 2021 पासून पूर्व नौदल कमांडकडून क्रॉस कोस्ट ऑपरेशनवर तैनातीवर होती आणि लवकरच बेस पोर्टवर परत येणार होती. या युद्धनौकेवर नेमका कोणत्या कारणाने झाला याचा तपास करण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आला आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.